आता ‘एक राज्य एक खेळ’ योजनेचा श्रीगणेशा, 2028 ऑलिम्पिकसाठी क्रीडा मंत्रालयाकडून पाऊल

474

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने 2028 सालामध्ये होणारे ऑलिम्पिक डोळ्यांसमोर ठेवून ‘एक राज्य एक खेळ’ या योजनेचा शुभारंभ केला आहे. त्यानुसार हिंदुस्थान ज्या खेळांमध्ये पदकांची लयलूट करू शकतो अशा 14 खेळांची निवड करण्यात आली आहे. हे सर्क खेळ प्रत्येक राज्याने दत्तक घेऊन त्या खेळांमधील खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयार करावे अशी योजना क्रीडा मंत्रालयाकडून बनवण्यात आली आहे.

ज्युनियर खेळाडूंवरही लक्ष ठेवणार
सध्या 10 ते 12 वय असणाऱया उदयोन्मुख खेळाडूंकरही क्रीडा मंत्रालयाकडून विशेष लक्ष देण्यात येणार आहे. अशा गुणवान खेळाडूंची निकड करून त्यांना प्रशिक्षणासाठी ऍकॅडमीत घेतले जाणार आहे. जेणेकरून हे खेळाडू पुढे जाऊन 2024व 2028 सालामधील ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करू शकतील.

आपली प्रतिक्रिया द्या