आरोग्यक्षेत्र घेणार डिजिटल भरारी, 10 वर्षांत दीड लाख कोटींची होणार गुंतकणूक; फिक्कीचा अहकाल

लॉकडाऊन दरम्यान देशातील आरोग्य क्षेत्रातदेखील अमुलाग्र बदल पाहायला मिळाले आहेत. पुढील दहा वर्षांत देशातील आरोग्यक्षेत्र मोठी डिजिटल भरारी घेणार असून राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनअंतर्गत तब्बल 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते, अशी शक्यता फिक्की आणि बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) यांच्या अहवालातून वर्तवली आहे.

आरोग्य क्षेत्रातील डिजिटल भरारी या विषयावर फिक्की आणि बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप यांनी आपला अहवाल नुकताच सादर केला आहे. यासाठी देशभरात डॉक्टर आणि रुग्णांची मते जाणून घेतली होती. यात लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात डिजिटल संवाद वाढल्याचे दिसले. लॉकडाऊनमध्ये 85 टक्के डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर केला केल्याचे सांगितले. तर डिजिटल माध्यम जास्त प्रभावी असल्याचे 50 टक्के डॉक्टरांनी मान्य केले.

मोठय़ा शहरातील 60 टक्के नागरिकांनी कोरोनाच्या संकटानंतर देखील आपल्याला किरकोळ आजारांसाठी डॉक्टरांचा प्राथमिक सल्ला डिजिटल माध्यमातून घ्यायला आवडेल, असे सांगितले. तर 2000 खेडेगावांतील 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांनी याकाळात डॉक्टरांचा सल्ला फोनवरून घेतल्याचे मान्य केले. यातील अनेकांनी आपण पहिल्यांदाच फोनकरून डॉक्टरांचा सल्ला घेल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या