इंदुरीकर महाराज खटल्याची पुढील सुनवाणी दिवाळीनंतर

nivrutti-indurikar-1

कीर्तनातून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्याविरोधात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल आहे. आज होणारी सुनावणी टळली असून, पुढील सुनावणी दिवाळीनंतर 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव ऍड. रंजना पगार-गवांदे यांनी इंदुरीकर महाराजांविरोधात जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली होती. जिल्हा शल्यचिकित्सकांनी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते. यामुळे त्यांच्याविरोधात घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी 19 जून रोजी संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या