इम्युनिटी कशी वाढवाल… इंटरनेटवर आरोग्याशी संबंधित सर्चिंग वाढले

कोरोना काळात लोकांना घरात राहावे लागतेय. बरीचशी कामे ऑनलाईन करावी लागत आहेत. लोकांच्या सवयी खूप बदलल्या आहेत. अशातच लोक आपल्या आरोग्याकडे विशेषतŠ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात इंटरनेटवर याच विषयाशी संबंधित सर्वाधिक सर्चिंग झाल्याचे एका अहवालातून दिसून आले आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूक, मनोरंजन आणि ऑनलाईन शिक्षण यासंबंधित सर्चिंगही जास्त झालेले आहे.

इनमोबी या वेबसाईटने इंडिया 2021 ट्रेंड्स रिपोर्ट अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात कोरोना महामारीनंतर नेटिजन्सच्या ‘सर्च प्रेफरन्स’मध्ये आलेला बदल दाखवण्यात आला आहे. एप्रिल 2020 ते जून 2021 या दरम्यान इंटरनेटवर ज्या गोष्टी सर्च करण्यात आल्या आहेत त्यावरून हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. अहवालानुसार मागील वर्षभरात आरोग्य आणि इम्युनिटी संबंधित सर्चिंगमध्ये 125 टक्के वाढ दिसून आली. इंटरनेटवर होम फिटनेस संबंधित गोष्टींचा शोध घेण्यात आला. यात ऑनलाईन डान्स आणि होम जीम यांचा सहभाग असून त्यांच्या सर्चिंगमध्ये अनुक्रमे 28 टक्के  आणि 14 टक्के वाढ दिसून आली.

काय सांगतो अहवाल

  • आरोग्यासोबतच ऑनलाईन शिक्षणाबाबत नेटिजन्स जागरूक झाले आहेत. ऑनलाईन शिक्षणाबाबत आधीच्या तुलनेत गेल्या वर्षभरात तब्बल 367 टक्के जास्त सर्च करण्यात आले.
  • मनोरंजनात्मक तसेच संगीतमय पंटेंट शोधण्याकडेही लोकांचा कल राहिला.
  • ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला चालना मिळाली असून लोक सुपरमार्केटवरून ऑनलाईन ग्रोसरी स्टोअरकडे वळल्याचे दिसून आले आहे.
  • डिजिटल पेमेंटबाबतच्या शोधांमध्ये 12 टक्के वाढ दिसून आली. अॅसेट मॅनेजमेंटबाबत 13 टक्के अधिक सर्च झाले आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या