ऑनलाइन शिक्षक भरती,10 जानेवारीपर्यंत शाळेचे पर्याय निवडता येणार

998
फोटो प्रातिनिधीक

पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱया ऑनलाइन शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना शाळेचे पर्याय ‘लॉक’ करण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांकडून त्यांना आलेले प्राधान्यक्रम योग्य असल्याची खात्री करण्याबाबत एनआयसीकडे विचारणा करण्यात येत आहे. याबाबत एनआयसीने स्पष्ट केले की,‘खासगी शिक्षणसंस्थांमधील रिक्त जागांतर्गत नववी ते बारावी या गटातील 10 संस्थांमधील रिक्त जागांचा तपशील देण्यात आला असून उमेदवारांनी प्रवर्ग, समांतर आरक्षण अथवा इतर बाबी लक्षात घेऊन प्राधान्यक्रम तपासावा’.

लॉग इन केल्यास उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम न दिसल्यास प्राधान्यक्रम डिलीट करून पुन्हा जनरेट करून लॉक करावेत. त्यासाठी उमेदवारांना शाळा प्राधान्यक्रम डिलीट करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. पुन्हा लॉगईन केल्यानंतर रिपोर्ट मेन्यूतील लॉक प्रेफरेन्सवर क्लिक करून त्याची प्रत घेण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत आहे.

उर्दू माध्यमातील रिक्त पदांसाठी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यांची व्यवस्थापननिहाय शिफारसपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांच्या लॉगईनवर ही यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीत नाव आलेल्या उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी 10 जानेवारीपर्यंत संबंधित संस्थेत उपस्थित राहून नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या