‘ऑल इज वेल’! बिग बॉस मराठीचा नवा सीझन येतोय!!

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीजन लवकरच भेटीला येणार आहे. या घरामध्ये यंदा काय विशेष असेल? कोणती थीम असेल? कोण स्पर्धक असतील? या सस्पेन्सवरून लवकरच पडदा हटणार आहे.

बिग बॉस मराठी हे नाव आलं की, सगळय़ांना पहिले आठवतं ते म्हणजे भांडण, वाद, पण, या कार्यक्रमात बऱयाचशा चांगल्या गोष्टीदेखील घडतात. म्हणून या वेळेसची बिग बॉस मराठीची थीम ‘ऑल इज वेल’ ही आहे. बिग बॉस मराठीचं या सीझनमधील घर खूप खास आणि आलिशान असणार आहे. बिग बॉसचे घर जवळपास 14 हजार चौरस फूट भव्य जागेमध्ये तयार केले आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बऱयाच प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. विविध रंगांनी नटलेलं हे घर असणार आहे.

बिग बॉस मराठी सीझन 4 एका दिमाखदार सोहळय़ाद्वारे 2 ऑक्टोबर सायंकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानंतरचे भाग सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि शनिवार आणि रविवार रात्री 9.30 वाजता कलर्स मराठीवर पाहता येतील. या वेळेसदेखील 24 तास लाइव्ह फीड प्रक्षेपित न केलेले भाग प्रेक्षक वूट अॅपवर पाहता येतील.

बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन खास असणार आहे. स्पर्धक आणि माझ्यात तसेच येणाऱया पाहुण्यांमध्ये काचेची भिंत नसेल. नवा सीझन म्हणजे काहीतरी वेगळं असणारच. मी यावेळेस जरा ‘वेगळी शाळा’ घेणार आहे.
– महेश मांजरेकर, सूत्रसंचालक