कन्नड लेखकाच्या तोंडाला काळे फासले

55

सामना ऑनलाईन, दावनगेरे 

कन्नडमधील दुन्धी या वादग्रस्त कांदबरीचे लेखक योगेश मास्टर यांच्या तोंडाला उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काल येथे काळे फासले. गौरी लंकेश या साप्ताहिकाच्या प्रकाशनानिमित्त योगेश मास्टर हे कर्नाटकमधील दावनगेरे येथे आले होते. ते एका टी स्टॉलमध्ये बसलेले असताना जय श्रीराम अशी घोषणाबाजी करीत आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळी शाई फासली. आपण हिंदू देवदेवतांविरुद्ध लिखाण कराल तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील, असा इशारा या कार्यकर्त्यांनी येथून पळून जाण्यापूर्वी योगेश मास्टर यांना दिला.

आपली प्रतिक्रिया द्या