गर्भाशयाच्या कर्करोगाशी लढा

171

बसून काम, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धूम्रपान आणि कमी वयात लैंगिक संबंध यामुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. हा रोग केवळ खेडय़ापाडय़ातल्या महिलांना होतो असा पूर्वी समज होता. पण आता आकडेवारीनुसार पाहिलं तर विकसित शहरांमधल्या महिलांनाही तो झालेला दिसून येतो.

गर्भाशयात पेशींची प्रमाणापेक्षा अधिक वाढल्या की हा विकार जडतो. स्तनांच्या कर्करोगानंतर गर्भाशयाचा कर्करोग हा हिंदुस्थानातील महिलांमध्ये आढळणारा विकार आहे. या रोगामुळे दरवर्षी सुमारे 74 हजार महिलांचा मृत्यू होतो. अस्वाभाविक रक्तस्राव, नेहमीपेक्षा अधिक उत्सर्जन, ओटीपोटात वेदना, लघवीला वेदना होणे ही गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. या रोगाबद्दल लोकांमध्ये एक अनामिक भीती असते. वास्तविक गर्भाशयाची नियमित चाचणी करण्यात आली तर हा धोका टाळता येतो. लक्षणांपैकी एखादेही दिसले तरी गर्भाशयाची चाचणी करून घ्यायला हवी.

गरोदरपणात शक्यतो गर्भाशयाची चाचणी करू नये. प्रसूतीनंतर तीन महिन्यांनी ही चाचणी केली तर चालू शकेल. या पॅप स्मिअर चाचणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह असतील तर रुग्ण परत येत नाहीत. पण महिलांनी हा कर्करोग टाळण्यासाठी नियमित चाचणी करून घेणे गरजेचे आहे.

डॉ. जगदीश कुलकर्णेी,

एशियन कॅन्सर इन्स्टिटय़ूट

कंसल्टिंग ऑन्को सर्जन

 

आपली प्रतिक्रिया द्या