चाकणमधील एसटी बसस्थानकाची दुरावस्था

280

सामना प्रतिनिधी । चाकण, पुणे

चाकण येथील एसटी बसस्थानक म्हणजे अनधिकृत वाहनाचे “अधिकृत “ वाहनतळ झाले आहे. अनेक बेकायदेशीर वाहनांच्या पार्किंगमुळे तसेच स्थानकाच्या आवारातील व्यवसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे बसस्थानकाच्या आवारात एक–दोन स्थानिक वाहतूक करणाऱ्या एसटी बस वगळता दुसऱ्या एस टी बस दिसत नाहीत. खासगी वाहनाच्या अतिक्रमणामुळे हे वाहनतळ आहे की बसस्थानक अशी शंका येऊ लागली आहे.

काही वर्षापूर्वी चाकण बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. सदर नूतनीकरण बांधा, वापरा, हस्तांतर करा या तत्वावर झाले असल्याने बसस्थानकाच्या आवारात अनेक व्यापारी गाळे आहेत. त्यामुळे ग्राहकांची वाहने बसस्थानकाच्या आवारातच उभी केली जातात. या कारणास्तव पुण्याकडे जाणाऱ्या अनेक एसटी बसेस स्थानकाकडे न वळता हमरस्त्यावरून परस्पर जातात. त्यामुळे प्रवाशांची नाहक त्रासाला सामेरं जावं लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या