चॅम्पियन्स ट्रॉफी : निर्णय परस्पर घेऊ नका, राय यांनी बीसीसीआयला बजावले

दत्ता गायकवाड (१९५९) – ४ सामने

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील सहभागाबाबतचा निर्णय बीसीसीआयने परस्पर घेऊ नये. अंतिम निर्णयासाठी प्रथम क्रिकेट बोर्डाने विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी आणि सभेने घेतलेल्या निर्णयाला प्रशासक समितीची (सीसीए) मंजुरी घ्यावी. त्यानंतरच आयसीसीशी पत्रव्यवहार करावा, असे प्रशासक समितीप्रमुख विनोद राय यांनी हिंदुस्थानी क्रिकेट बोर्डाला बजावले आहे.

आयसीसीच्या नव्या महसूलवाटप मॉडेलवर बीसीसीआयने विशेष सर्वसाधारण सभेत चर्चा करावी. प्रशासक समितीच्या पूर्वपरवानगीशिवाय चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून माघार घेण्याचा अथवा महसूल वाटपाच्या नव्या धोरणाबाबत आयसीसीला कायदेशीर नोटीस पाठवू नये, असे विनोद राय यांनी बीसीसीआयला बजावले.

माघारीचा निर्णय एकमताने घ्या!
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतल्यास टीम इंडियाला आठ वर्षे आयसीसीच्या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही याचे भान ठेवा. बोर्डाच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्व ३० सदस्यांनी एकमताने या स्पर्धेतील माघारीचा निर्णय घेतल्यास आमचा आक्षेप असणार नाही असे सांगून राय म्हणाले, माजी बीसीसीआय अध्यक्षा एन. श्रीनिवासन यांच्या गटातील सदस्यांनी टेलिकॉन्फरन्स घेऊन चॅम्पियन्स करंडकातून माघारीबाबत व आयसीसीच्या कायदेशीर नोटीस पाठवण्याबाबत चर्चा केली. प्रशासक समितीला हा प्रकार आवडलेला नाही, असे राय म्हणाले.