ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना डेंग्यू

885

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना डेंग्यू झाला असून तीन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. गेल्या आठवड्यात धर्मेंद्र यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

धर्मेंद्र पंजाब व लोणावळा येथील फार्म हाऊसवर त्यांचा जास्तीत जास्त वेळ घालवतात. काही दिवसांपूर्वीही ते लोणावळा येथे गेले होते. पण तिथून आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. काही दिवस त्यांना सतत ताप येत होता. तपासणीत त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यानंतर  त्यांना मुंबईतील नामांकित रुग्णालयात दखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांना बरे वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या