झोमॅटोवर ऑर्डर करणे पडले महाग, खात्यातून उडाले 91 हजार

721

दिल्लीला लागून असलेल्या गाजियाबाद मध्ये एका इंजिनीयरिंगचा विद्यार्थ्याला झोमॅटोवरून ऑर्डर करणे महागात पडले आहे. त्याने झोमॅटोवरून काठी रोल आणि रुमाली रोटीची ऑर्डर दिली. पण त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून 91 हजार रुपये गायब झाले. यामुळे हादरलेल्या तरुणाने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी झोमॅटोवर गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थ बंसल असे या तरुणाचे नाव आहे.

रामप्रस्थ कॉलोनीत राहणाऱ्या सिद्धार्थचे वडील सर्वोच्च न्यायालयात अॅडव्होकेट आहेत. तर आई डॉक्टर आहे. सिद्धार्थ इंजिनीयरिंगच्या पहील्या वर्षात शिकत आहे. त्याने मंगळवारी झोमॅटोवरून काठी रोल, रुमाली रोटी ऑर्डर केली होती. त्यानंतर कोणीतरी त्याच्या बँक खात्यातून 91 हजार 196 रुपये काढल्याचे त्याच्या लक्षात आले. यादरम्यान त्याच्या खात्यातून सातवेळा पैसे काढण्यात आले. पण सिद्धार्थने बँकेने पैसे काढताच पाठवलेले मेसेज उशीरा पाहीले. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला सात टप्प्यात पैसे काढण्यास वेळ मिळाला.

दरम्यान, याआधीही झोमॅटोवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. झोमॅटोवरून ऑर्डर केल्यावर ग्राहकाला कधी शाकाहाराऐवजी मांसाहार पाठवण्यात आल्याच्याही घटना घ़डल्या आहेत. याप्रकरणी न्यायालयाने झोमॅटोला दंडही बजावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या