टिप्स

सामना ऑनलाईन

 • सफरचंद सोलून त्याचे बारीक तुकडे करा. या तुकड्यांना थोडे मीठ लावून सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी खा. डोकेदुखी बरी होईल.
 • मासिक पाळीचा जास्त त्रास होत असेल तर थंड पाण्यात दोन-तीन लिंबांचा रस पिळून ते पाणी प्यावे.
 • भाजले असेल, उन्हाने त्वचा करपली असेल, त्वचेवर सुरकुत्या पडल्या असतील अथवा एखादा त्वचाविकार झाला असेल तर कच्च्या बटाट्याचा रस काढून तो त्या जागी लावावा. फरक दिसेल.
 • लोण्यात थोडे केसर मिसळून ओठांना दररोज लावल्यास काळे ओठही गुलाबी दिसू लागतील.
 • तोंडाला दुर्गंध येत असेल तर दालचिनीचा छोटासा तुकडा तोंडात ठेवा. तोंडाचा दुर्गध लगेच दूर होईल.
 • सर्दीने नाक वाहात असेल तर युकेलिप्टसचे तेल रुमालावर शिंपडून त्याने श्वास घ्या. आराम मिळेल.
 • घोळीपूर्वी केसांना काही दिवस रोज कांद्याचा लगदा करून तो लावल्यास अकाली पांढरे झालेले केस काळे होऊ लागतील.
 • चहाच्या उकळवलेल्या पाण्याने केस धुतल्यास केसगळती थांबू शकते.
 • वांग्याच्या भरीतामध्ये थोडे मध मिसळून खाल्ल्यास निद्रानाश दूर होतो. रात्रीच्या जेवणात मध लावलेल्या वांग्याचे भरीत खायचे.
 • संत्र्याच्या रसात थोडे मध मिसळून तो रस दिवसातून तीनवेळा प्यायल्यास गर्भवतींची अतिसाराची तक्रार दूर होईल.
 • घसा खवखवत असेल तर सकाळच्या वेळी बडीशोप चावून खाल्ल्यास बंद गळा मोकळा होईल.