‘टीम इंडिया’ पुनरागमन करेल, सचिन तेंडुलकरला विश्वास

327
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची यावर्षीची कमाई ८२.५० कोटी आहे.

सामना ऑनलाईन, मुंबई – नवी दिल्ली – पुण्यात झालेल्या सलामीच्या कसोटी क्रिकेट सामन्यात ३३३ धावांनी पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यामुळे ‘टीम इंडिया’वर टीकेची झोड उठली आहे. मात्र चौफेर टीका होत असलेल्या विराट कोहलीच्या सेनेसाठी क्रिकेट देव अर्थातच विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकर धावून आला. ‘‘केवळ एका पराभवाने सर्व काही संपत नाही. ‘टीम इंडिया’ चार सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त पुनरागमन करेल’’ असा विश्वासही ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरने व्यक्त केला.

सचिन म्हणाला, केवळ एका पराभवाने मालिकेचा निकाल लागत नाही. जय-पराजय हा खेळाचा भाग असतो. सलामीची लढत हिंदुस्थानसाठी खरंच ‘कसोटी’ची ठरली. अशा अनेक पराभवांतून हिंदुस्थानने फिनिक्सभरारी घेतली आहे. या पराभवातून हिंदुस्थानी खेळाडू धडा घेतील व दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघावर तुटून पडतील. पराभवानंतर तुम्ही कसे सावरता, कसे पुनरागमन करतात हे खूप महत्त्वाचे असते, असेही सचिनने सांगितले. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान दुसरा कसोटी सामना बंगळुरूमध्ये ४ मार्चपासून सुरू होणार आहे.

जयंत, ईशांतला वगळले जाऊ शकते!

azharuddin-m

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत हिंदुस्थानचा दारुण पराभव झाल्याने दुसऱ्या सामन्यासाठी ‘टीम इंडिया’त काही बदल होऊ शकतात. बंगळुरूतील खेळपट्टी पुण्यातील खेळपट्टीइतकी फिरणारी नसेल. त्यामुळे फिरकीपटू जयंत यादव व वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यांना अंतिम अकरामधून वगळले जाऊ शकते. फलंदाजीतील खोली वाढविण्यासाठी जयंतऐवजी करुण नायर तर ईशांतऐवजी भुवनेश्वर कुमारला संधी मिळू शकते. नायर एक चांगला फलंदाजही आहे तर भुवनेश्वरची स्विंग गोलंदाजी फायदेशीर ठरू शकते.
– मोहम्मद अझरुद्दीन, (माजी कर्णधार, हिंदुस्थान)

आपली प्रतिक्रिया द्या