ट्रम्प यांनी पहिल्यांदाच घातला मास्क, फोटो झाला व्हायरल

612

जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान माजविले असताना सगळीकडे मास्क घालणे हे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अनेकदा मास्क न घालताच वावरताना अनेक वेळा दिसले. त्यामुळे ट्रम्प यांच्यावर अनेकदा टीकेची झोड उठविण्यात आली होती. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मास्क घातल्याचे वृत्त समोर आले असून त्यांचा मास्क घातलेला फोटोदेखील व्हायरल झाला आहे.

येथील वॉल्टर रीड राष्ट्रीय लष्करी वैद्यकीय केंद्राला ट्रम्प यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी हा मास्क घातला आहे. यावेळी त्यांनी जखमी जवानांची आणि आरोग्य कर्मचाऱयांची भेट घेतली. ‘मी कधीही मास्कच्या विरोधात नव्हतो. पण ते परिधान करण्याची एक विशिष्ट वेळ आणि जागा असते’ असे त्यांनी यावेळी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या