तंत्रज्ञानातील रंग

अमित घोडेकर,[email protected]

आपली आवडती गॅझेटस् मोबाईल, टॅब, आयफोन, ऍण्ड्रॉइड वॉच इ.. या साऱयांमध्ये महत्त्वाचे ठरतात ते रंग

हर रंग कुछ कहता है’… म्हणूनच मग जेव्हा स्टीव्ह जॉब्सने जेव्हा आयफोन बनवायला घेतला तेव्हा त्याचा दोन गोष्टीवर कटाक्ष होता. एक म्हणजे मोबाइलमधून निघणारं संगीत किंवा आवाज आणि मोबाइलमधून दिसणाऱया चित्र आणि रंगाचा दर्जा कारण स्टीव्ह जॉब्सला खात्री होती की या दोन गोष्टी जर उत्कृष्ट असतील तर आयफोनला विकत घेण्यासाठी लोकांची रांग लागेल आणि आजदेखील ती गोष्ठ खरी ठरत आहे. आज आयफोनमध्ये रेटीना डिस्प्ले नावाचे तंत्रज्ञान वापरले जाते. ते इतके उत्कृष्ट आहे की डोळ्याचा पडदादेखील त्यात वापरले जाणारे रंग अगदी बरोबर ओळखतो. म्हणूनच त्याचे नावदेखील रेटीना डिस्प्ले असे ठेवले आहे.

पण डिजिटल किंवा गॅजेट्समधल्या रंगावर फक्त आयफोनच कटाक्ष देतो असे काही नाही याची सुरुवात बरीच अगोदरपासून झाली होती सोनीचा जगप्रसिद्ध ‘ब्राव्हिया’ हा टीव्ही फक्त आणि फक्त त्याच्या सर्वोत्कृष्ट रंग आणि चित्रासाठी प्रसिद्ध झाला. आजदेखील सोनी ‘ब्राव्हिया’ हे नाव घेतल्याबरोबर आपल्यासमोर अतिशय सुंदर रंग आणि चित्रे येतात. सोनीच्या ‘ब्राव्हिया’ची अजून खास बात म्हणजे यातील रंग अतिशय निरव आणि शांत आहेत. म्हणजेच समोर दिसताना ते गडद दिसत असतील पण तोच रंग दुसऱया कोणत्याही टीव्हीवर भडक दिसतो. त्यामुळेच ‘ब्राव्हिया’चे रंग डोळ्यांना कमी इजा करणारे असतात. सोनी ‘ब्राव्हिया’चं तंत्राद्यान एवढ लोकप्रिय झाल कि पुढे सोनीने ‘ब्राव्हिया’चा वापर त्यांच्या सगळ्याच गॅजेट्समध्ये करायला सुरुवात केली.

आयफोन आणि सोनी जेव्हा रंगावर एवढं काम करत होते तेव्हा जगातील सगळ्यात मोठी इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारी कंपनी सॅमसंगदेखील यात कशी मागे असेल? त्यांनीदेखील ‘ऍमोलेड’ नावाचं एक खास तंत्रज्ञान विकसित केलं. हे तंत्रज्ञान आजच्या घडीला जगातील रंग उद्दीपित करणारे सगळ्यात उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. यात वेगळ्या प्रकारचे सेन्सर्स वापरले जातात, जे त्यावेळेच्या प्रकाशाप्रमाणे कोणत्या रंग कशा प्रकारे उद्दीपित करायचा हे ठरवतो. उदा. समजा तुम्ही संध्याकाळी एखादा चित्रपट बघत असताल आणि बाहेर अंधुक प्रकाश असेल तर ‘ऍमोलेड’ तंत्रज्ञान त्यावेळेस तो रंग कशा चांगल्या प्रकारे दिसेल हे स्वतः ठरवतो आणि अगदी तसाच दाखवतो. या तंत्रज्ञानामुळे एकाच रंग प्रत्येक वेळेस वेगळा दिसतो. उदा. पिवळा रंग सकाळी वेगळा भासेल, दुपारी वेगळा आणि संध्याकाळी वेगळा, त्यामुळेच हे तंत्रज्ञान सध्याचे सगळ्यात लोकप्रिय तंत्रज्ञान आहे.

गॅजेट्सच्या जगात रंगांची अजूनदेखील खूप धूम माजली आहे. आजकाल ‘हायडेफिनेशन एचडी’ हा शब्द बऱयाचदा आपल्या कानावर पडतो. मोबाइलवर चित्रपट बघताना तर अरे तुझ्याकडे ‘एचडी’ प्रिंट आहे का? हे विचारूनच आपण चित्रपट डाऊनलोड करून घेतो. ‘हायडेफिनेशन एचडी’ हे सध्याचं अजून एक क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे. यात चित्र आणि रंग एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहेत. ‘एचडी’बरोबर ‘3डी’मध्ये कोणतीही गोष्ट पाहणे म्हणजे एक नेत्रदीपक सोहळाच असतो.

डिजिटल रंगामधली क्रांती कृष्णधवल रंगापासून ते आता एचडीत येऊन पोचली आहे. भविष्यातले रंग कसे असतील ह्याचा सध्यातरी आपण विचारच केलेला बरा.

 

आपली प्रतिक्रिया द्या