तुमचे शहर आणि तुमच्या समस्या

94

जसजशा निवडणुका  जवळ येत आहेत तसतसा वृत्तपत्रांतून समस्यांचा पाढा जोरजोरात वाचला जातोय. परंतु कोणीही मुंबई कर रोज आदळणाऱ्या लोकांच्या लोंढय़ाबद्दल चकारशब्द काढत नाही किंका लिहीत नाही याचेच आश्चर्य  काटते. याचा अर्थ आम्ही मुंबईत येऊन इथल्या सर्क सुविधा वापरणार, फूटपाथ व्यापणार, रस्त्यांकर बेदरकारपणे वाहने रेटणार, घाण करणार आणि पैसे कमावून आपल्या प्रांतात निघून जाणार, मरो ते तुमचे शहर आणि तुमच्या समस्या आम्हाला काही देणं-घेणं नाही अशीच धारणा दिसते. हे असेच सुरू राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल व अराजक माजेल, शिवाय मुंबईची अतिरिक्त लोकसंख्या सामाविण्याची क्षमता संपली आहे हेदेखील समस्या मांडणाऱ्यांनी ध्यानात ठेवाके.हा रोष  कोणावर आहे हेदेखील इथल्या स्थानिकांना माहीत आहे. तेव्हा ‘सुज्ञास सांगणे न लगे’

-मिलिंद कोर्लेकर, ठाणे

डिजिटल होणं म्हणजे नेमकं काय

नोटाबंदीनंतर न अनुभवलेल्या अशा अनेक गोष्टींना सामोरं जाण्यास आपण तयार झालो आहोत. या दोन महिन्यांच्या कालावधीत आपण स्वत:ला कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास सक्षम झालो आहोत, ही भावना माझ्यासकट अनेकांची झाली असावी. या परिस्थितीतून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर आता डिजिटल होण्याचं ध्येय माझ्यासारख्या अनेकांचं आहे. आता प्रश्न उरतो तो डिजिटल होणं म्हणजे नेमकं काय, हे शासनाने योग्य पत्रक काढून जाहीर करावं. कारण कोणत्याही शब्दामागे डिजिटल हा शब्द लावला की आपोआपच त्याचा भाव वधारत आहे, पण ते लागू कसं करावं, याबाबत प्रचंड अज्ञान आहे.

– विष्णू पाबळे, गिरगाव

आपली प्रतिक्रिया द्या