आठवड्याचे भविष्य

303

मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

समस्या
बरेच प्रयत्न करूनही काही मुला-मुलींचे लग्न लवकर जमत नसेल तर…

तोडगा
लग्न हे शेवटी नशिबावर अवलंबून असते. पण तरीही तीन शनिवार विस्तवावर तुरटी ओवाळून टाकावी. लग्न चांगल्या ठिकाणी जमेल.

मेष
उत्तम साथ
प्रेमाचा आठवडा असेच येणाऱया दिवसांचे वर्णन करावे लागेल. अविवाहितांचे विवाह जुळतील. महत्त्वाच्या कामात जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. भावनिकदृष्टय़ा एकमेकांच्या जवळ याल. ऊर्जेची कमतरता जाणवेल. गुलाबी रंग जवळ बाळगा. शुभ आहार…स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, गुलाबाचे सरबत, शीत पदार्थ.

वृषभ
मानसिक सामर्थ्य
अंगभूत कौशल्य आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे तुम्हाला यश मिळेल. यामध्ये तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींची साथ मोलाची असेल. बाहेरचा प्रवास शक्यतो टाळा. निळा रंग जवळ बाळगा. शनिवारी मारुतीची उपासना करा. त्यामुळे मानसिक सामर्थ्य काढेल. शुभ आहार …पोळी, भाकरी, कर्बोदके

मिथुन
सुखाचे क्षण
तुमची कल्पकता आणि नियोजन यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. यातून अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. जोडीदाराबरोबर सुखाचे क्षण घालवाल. चमेलीची फुले घरात ठेवा. पांढरा रंग जवळ बाळगा…शुभ आहार…आवडीचे पदार्थ

कर्क
ज्येष्ठांचा आशीर्वाद
घरच्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरेल. महत्त्वाच्या कामात ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. फायदा होईल. लाभदायक फळ देणारा आठवडा. जोडीदाराच्या प्रेमाची उब जाणवेल. लाल रंग जकळ बाळगा. मनास तेजस्विता प्राप्त करून देईल. अनावश्यक फिरणे टाळा. शुभ आहार…गोड पदार्थ, गूळ, शिरा

सिंह
संकटांवर मात
एखाद्या मोठय़ा कार्यात तुमचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल. त्याचा तुमच्या घरच्यांना अभिमान काटेल. अनावश्यक खर्च टाळा. गणपतीची उपासना करा. लाल रंग जवळ बाळगा. अनपेक्षित संकटांना सहज मात देऊ शकाल. व्यायामात सातत्य ठेका.शुभ आहार… मत्स्याहार, गोडय़ा पाण्यातील मासे

कन्या
कल्पक गोष्टी
अनेक आनंदी क्षण या आठवडय़ात तुम्हाला आनंदी करतील. त्यामुळे दिवस मजेत जातील. सुट्टीचा आनंद घ्याल. हातून अनेक कल्पक गोष्टी घडतील. घरच्यांची उत्तम साथ लाभेल. आकडीच्या ठिकाणी फिरायला जाल. आकडीच्या वस्तूंची खरेदी होईल. हिरवा रंग जवळ बाळगा…शुभ आहार…पालेभाजी, मेथी, पालक

तूळ
कणखर मन
घरातील काही गोष्टींमुळे मनास अस्वस्थता येईल. पण काळजी करू नका. आपसूक गोष्टी मार्गी लागतील. तुमची बुद्धिमत्ता कामास येईल. त्यामुळे तुम्ही कुटुंबाच्या केंद्रस्थानी असाल. मन अत्यंत कणखर ठेवावे लागेल. जोडीदाराची साथ मोलाची ठरेल. भगवा रंग जवळ ठेवा…शुभ आहार…आंबा, आंब्याचा रस

वृश्चिक
उत्साह वाढेल
लाभदायक आठवडा. सरकारी कर्मचाऱयांना कामाच्या ठिकाणी लाभ होईल. विशेषतः लष्करी अधिकारी. त्यांच्या कामाची खूप प्रशंसा केली जाईल. त्यामुळे घरातही उत्साहाचे वातावरण राहील. आप्त स्वकीयांच्या भेटी होतील. मन प्रसन्न राहील. राखाडी रंग जवळ बाळगा.शुभ आहार…भाजणीचे पौष्टिक पदार्थ, पुरणपोळी

धनु
अर्थप्राप्ती होईल
कामाच्या ठिकाणी उगाच तणावाचे प्रसंग निर्माण होतील. पण तुमच्यापर्यंत काही येणार नाही. तुम्हीही कामाच्या ठिकाणी अलिप्त राहा. आवडत्या व्यक्तीशी भेट होईल. त्यामुळे अनेक सकारात्मक गोष्टी कराव्याशा वाटतील. अर्थप्राप्ती होईल. त्यामुळे खर्च करावासा वाटेल. अबोली रंग महत्त्वाचा…शुभ आहार… तुरीची डाळ, कैरीचे लोणचे, भात

मकर
मनास समाधान
नियमित व्यायाम आणि आहारातील संतुलन महत्त्वाचे ठरेल. जन्मगावी जाण्याची संधी येईल. ती गमावू नका. घरातील लहान मुलांसाठी खर्च कराल. त्यामुळे मनास समाधान मिळेल. नव्या व्यक्ती भेटतील. गप्पा होतील. ज्ञानात भर पडेल. आकाशी रंग जवळ बाळगा. शुभ आहार.. नैसर्गिक फळे, भाज्या

कुंभ
कायदा पाळा
महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय जपून घ्या. मोठे आर्थिक व्यवहार कराल. पण त्यात डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. फसवणूक होण्याचे प्रसंग येतील. कायदा पाळा. कामानिमित्त बाहेर जाल. आईची काळजी घ्या. तिला वेळ द्या. पांढरा रंग जवळ बाळगा. शिवोपासना करा. शुभ आहार…दूध, दही, ताक

मीन
भावबंध जुळतील
उच्चपदाचे योग येतील. त्यासाठी जीवतोड केलेली मेहनत कामी येईल. केलेल्या कामाबद्दल पारितोषिक मिळेल. पण खेळाडूंनी असंतुष्ट असावे. मेहनतीत कसूर नको. हिरवा रंग जवळ बाळगा. बाहेरील आहार टाळा. घरातील व्यक्तींशी भावनिक बंध दृढ होतील. शुभ आहार…आकडीचे पदार्थ

आपली प्रतिक्रिया द्या