नव्या वर्षानिमित्त पंतप्रधान मोदींनी पाडला आकर्षक घोषणांचा पाऊस

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
नोटाबंदीच्या ५० दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाला उद्देशून भा,ण केलं. या भाषणामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या. नोटाबंदीमुळे बँकांकडे कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झाली आहे असं सांगत पंतप्रधानांनी बँकांनाही आता गरीब, मध्यमवर्गीय यांना डोळ्यासमोर ठेऊन काम करा असा सल्ला दिला आहे. चर्चा यामुळे रिझर्व्ह बँक व्याज दर कमी करणार अशी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.या घोषणा करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वत्रिक निवडणुका एकत्र घेण्याबाबतही आता व्यापक चर्चा होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात कोणकोणत्या घोषणा केल्या आहेत त्या पाहूयात

  • गरीब, मध्यम वर्गातले लोकांना घर खरेदी करता यावं यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २ नव्या योजनांची घोषणा
  • घरांसाठी ९ लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याजावर ४ टक्के आणि १२ लाखापर्यंतच्या व्याजावर ३ टक्के सवलत देण्याचा निर्णय
  • डीसीसी बँका आणि प्रायमरी सोसायटींकडून खरीप आणि रब्बी पिकांसाठी कर्ज घेतलं होतं, त्या शेतकऱ्यांचं ६० दिवसांचं व्याज सरकार भरेल आणि ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल
  • नाबार्डकडून सहकारी बँकांसाठी २१ हजार कोटींची रक्कम देण्यात आली होती, त्यामध्ये २० हजार कोटींची भर घालण्याची घोषणा
  • ३ कोटी किसान क्रेडीट कार्ड ही ‘रूपे’ क्रेडीट कार्डात बदलणण्याचा निर्णय
  • ‘रूपे’ कार्डामुळे शेतकऱ्याला कुठेही त्याच्या कार्डाने खरेदी विक्री करता येऊ शकेल
  • मध्यम आणि लघु उद्योगांसाठी छोट्या व्यापाऱ्यांना १ कोटींवरून २ कोटींची क्रेडीट गॅरंटी देण्याचा सरकारचा निर्णय
  • ६५० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये सरकार गर्भवती महिलांना रूग्णालयात नोंदणी, पौष्टीक आहार, प्रसुतीसाठी ६ हजार रूपयांची आर्थिक मदत केली जाईल. ही रक्कम गर्भवती महिलेच्या खात्यात जमा केली जाईल
  • वरिष्ठ नागरिकांना साडेसात लाख रूपयांच्या रकमेपर्यंत १० वर्षांपर्यंत प्रतिवर्ष ८ टक्के व्याज दर देण्याचा निर्णय