नायजेरियात बंडखोरांचा तुरुंगावर हल्ला, 1844 कैदी पळाले

 नायजेरियातील विभाजनवादी गटाने सोमवारी एका तुरुंगावर ग्रेनेड, मशिनगन, स्फोटके आणि रायफल्सचा वापर करीत भीषण हल्ला केला. ‘इंडिजीनीयस पीपल ऑफ बायफारा’ या बंदी घालण्यास आलेल्या गटाने आग्नेय नाजेरियातील ओवेर्री शहरातील तुरुगावर हल्ला केल्यानंतर तुरुंगातील 1800 हून अधिक कैद्यांनी पलायन केल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. स्फोटकांचा वापर करून बंडखोर तुरुंगाच्या आवारातील अॅडमिनीस्ट्रेटिव्ह इमारतीत शिरले. या हल्ल्यामागे ‘इंडिजीनीयस पीपल ऑफ बायफारा’ या गटाचा हात असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. मात्र, सदर संघटनेने हल्ल्याचा इन्कार केला आहे. इमो राज्यातील वार्री तुरुंगावर हल्ला झाल्यानंतर तेथील 1,844 कैदी पळून गेल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली. पळालेल्या कैद्यापैकी 6 जण माघारी परतले असून 35 कैद्यांनी तुरुंगात परतण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या