नोटबंदीमुळे कर वसुलीत वाढ, सीमाशुल्क संकलनात मात्र घट

 

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नोटबंदीमुळे विविध प्रकारच्या कर वसुलीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र डिसेंबर महिन्यात सीमा शुल्क (कस्टम) वसुलीत ६ टक्के घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली. कर संकलनाच्या आकडेवारीचे हे अंदाज असून अंतिम आकडेवारी अर्थसंकल्पात सादर केली जाईल, असे जेटली यांनी स्पष्ट केले.

नोव्हेंबर महिन्यात राज्यांच्या वॅट कर वसूलीत वाढ झाली आहे. मात्र सोने आयातीलर नोटबंदीचा परिणाम झाल्यामुळे सीमाशुल्कात घट झाली आहे, असे जेटली यांनी सांगितले.

नोटबंदीचा जीडीपीवर झालेल्या परिणामाबदद्ल बोलताना जेटली म्हणाले, आता केवळ कर संकलनाची आकडेवारी समोर  आली आहे. जेव्हा जीडीपीचे आकडे समजतील तेव्हा त्यावर च्रछा करता येईल.

पेट्रोल पंपावर होणा-या कार्ड ट्रान्झॅक्शनवर एक टक्का अधिभार वसूलीच्या मुद्याबाबत आपण पेट्रोल मंत्रालय आणि बँका यांच्या संपर्कात आहोत, असे जेटली म्हणाले. या मुद्यावर लवकरच तोडगा काढू, असे ते म्हणाले.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी  दिलेल्या माहितीनुसार एप्रिल – डिसेंबर २०१५ च्या तुलनेत एप्रिल – डिसेंबर २०१५ मध्ये विविध प्रकारच्या कर वसुलीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. थेट कर वसुली १२.०१ टक्के, अप्रत्यक्ष कर वसुलीत २५ टक्के, सेवा कर वसुलीत २३.९ टक्के, सीमा शुल्क वसुलीत ४.१ टक्के, अबकारी कर वसुलीत ४३ टक्के वाढ झाली आहे.

डिसेंबर २०१५ च्या तुलनेत डिसेंबर २०१६ मध्ये चांगली वाढ झाली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये केंद्रीय अबकारी कर वसुलीत ३१.६ टक्के, सेवा कर वसुलीत १२.४ टक्के, तर एकूण अप्रत्यक्ष कर वसुलीत १२.८ टक्के वाढ झाली आहे. मात्र सीमाशुल्क वसुलीत ६ टक्के घट झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या