पीओकेत निदर्शने; पोलिसांचा लाठीमार

पाकिस्तानपासून वेगळे होण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून रॅली काढणाऱया तसेच या मागणीचा हट्ट धरत इम्रान खान सरकारविरुद्ध बंड पुकारणाऱया पाकव्याप्त कश्मीरमधील नागरिकांवर पाकिस्तान पोलिसांनी मंगळवारी बेछूट गोळीबार करत लाठीचार्जही केला. वेगळय़ा पलुस्तान राज्याच्या निर्मितीसाठी रस्त्यावर उतरलेल्या या नागरिकांवर झालेल्या या अमानवीय लाठीहल्ल्यात दोन जण ठार झाले. तर इतर अनेक जण गंभीर झाले आहेत. पाकिस्तान पोलिसांकडून झालेल्या या निर्घृण हल्ल्याचा तसेच गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल होताच पाकव्याप्त कश्मीरमधील नागरिकांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

पश्तूनी नागरिकांवर होणाऱया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या पश्तूनी नागरिकांनी गेल्या महिन्यात पाकिस्तान सरकारविरुद्ध युद्ध छेडण्याचाच इशारा दिला होता. स्वातंत्र्यासाठी प्रदर्शन करत रस्त्यावर उतरलेल्या या नागरिकांवर पोलिसांनी अश्रूगॅसचा मारा केला. तसेच 22 जणांना अटकही केली.

आपली प्रतिक्रिया द्या