प्रभासने ‘बाहुबली-२’साठी नाकारली १० कोटींची जाहिरात !

सामना ऑनलाईन । मुंबई

संपूर्ण देशभरातच नाही तर परदेशातही ‘बाहुबली’ने अभिनेता प्रभासला लोकप्रियता मिळवून दिली. प्रभासला बाहुबलीमुळे लग्नाचे प्रस्तावच नाही तर अनेक जाहिरातींच्या ऑफर आल्या पण त्याने त्या नाकारल्या. सुमारे दहा कोटी रुपयांच्या जाहिरातीचाही यामध्ये समावेश आहे.

प्रभासला तब्बल ६००० लग्नाचे प्रस्ताव बाहुबलीनंतर आले होते, जे त्याने नाकारले. त्याचबरोबर ‘बाहुबली द बिगीनिंग’च्या यशानंतर त्याला अनेक जाहिरातींची ऑफर आल्या होत्या, पण त्याने त्यादेखील नाकारल्या. यामध्ये एका जाहिरातीसाठी त्याला १० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. पण त्याने ती नाकारली, कारण त्याला फक्त आणि फक्त ‘बाहुबली २’ वर लक्ष केंद्रीत करायचं होतं. याशिवाय प्रभासने एस.एस. राजामौली यांना दिलेल्या कमिटमेंटमुळे बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांना नकार दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या