बेस्ट प्रशासनास सूचना

217

<< आत्माराम बने >>

मुंबई बेस्ट प्रवास करत असताना बेस्टसंबंधी बऱयाच समस्या समोर दिसून येत आहेत.

* गोराई किंवा चारकोप डेपो येथून सोडण्यात येणाऱया लांब पल्ल्याच्या गाडय़ा वेळेवर येत नाहीत, परंतु रूट क्रमांक ३४५ च्या तीन ते चार गाडय़ा मात्र पाठोपाठ सोडल्या जातात. सदर बसमध्ये नेमकेच प्रवासी दिसून येत आहेत.

* अनेक बसेसवर इलेक्ट्रॉनिक नावे, रूट नंबर लावलेले प्रवाशांना बरोबर दिसून येत नाही व त्यामुळे बऱयाच वेळा प्रवाशांची गैरसोय होते. तरी नाव व नंबर व्यवस्थित दिसतील अशी व्यवस्था बेस्ट प्रशासनाने करावी.

* बेस्ट प्रवासामध्ये सध्या बऱयाच ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. प्रशासनाने दिलेली आसनेदेखील कमी भासू लागली आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक नसलेले प्रवासीसुद्धा सदर सीटचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात किंवा अपंगांसाठी तीन आसने ठेवलेली आहेत. ज्याच्याकडे अपंगत्वाचे सर्टिफिकेट असेल तरच सदर आसनावर बसण्याचा अधिकार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक कार्ड अनिवार्य करावे. कार्ड तपासणीचे काम हे तिकीट तपासनीसांना देण्यात यावे. ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल तर राखीव सीटवर बसण्याचा अधिकार आहे. तसेच गरोदर महिला अथवा ज्येष्ठ नागरिक महिला यांनासुद्धा ज्येष्ठ महिलांसाठी राखीव आसने ठेवलेली आहेत. त्यासुद्धा ज्येष्ठ पुरुषांच्या राखीव सीट अडविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्यासाठी चार आसने राखीव आहेत, परंतु काही त्याकडे दुर्लक्ष करतात.

* लांबपल्ल्याच्या गाडय़ा गर्दीच्या वेळी सकाळ-संध्याकाळ अशावेळी वाढविण्यात याव्यात. अशा गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिक व स्त्रीयांना जास्त त्रास सहन करावा लागतो.

* असे दिसून आले आहे की, गर्दीच्या वेळी महिला विशेष गाडय़ा सोडल्या जातात. काही वेळा सदर बसमध्ये कमी महिला प्रवासी प्रवास करताना दिसून येते. अशा वेळी सदर बसमध्ये ज्येष्ठ नागरिक पुरुषांना चढण्यास मुभा असावी.

* बेस्ट प्रशासनाने तिकीट दर कमी केल्यामुळे बेस्ट प्रवासी संख्या वाढलेली दिसते. तरी बसेस वाढवाव्यात या सूचनेकडे लक्ष द्यावे.

 

आपली प्रतिक्रिया द्या