महानगरपालिका निवडणुका फेब्रुवारीत होणार

सामना ऑनलाईन, नागपूर

राज्यातील प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकीची तारीख काय असेल याबाबत बरेच आडाखे बांधले जातायत. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी या निवडणुका फेब्रुवारीतच होतील असं स्पष्ट केलं आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक,नागपूर,पिंपरी-चिंचवड, नाशिक,उल्हासनगर,नागपूर,सोलापूर, अमरावती, अकोला या महानगरपालिकांची मुदत मार्च-एप्रिलमध्ये संपत आहे. या महानगरपालिकांसाठी फेब्रुवारीमध्येच मतदान होईल असं राज्य निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.राज्यातील प्रमुख महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तारीख काय असेल याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.