Video – महिलेने मोडला कोविडचा नियम, पोलिसाने दंड म्हणून केलं ‘किस’

महिलेने नियम मोडला म्हणून पोलिसाने तिला दंड आकारण्याऐवजी तिचं चुंबन घेतल्याची घटना घडली आहे. या पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे.

हे प्रकरण पेरू देशातील आहे. येथील एका टीव्ही चॅनलने या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केलं आहे. या व्हिडीओत असं दिसतं की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले निर्बंध एक महिला तोडते. त्यामुळे पोलीस तिला अडवतो. पोलिसाच्या हातात महिलेची माहिती लिहिण्यासाठी नोटपॅडही या व्हिडीओत दिसत आहे.

महिला त्याच्याशी बोलत असताना त्याच्या अत्यंत जवळ येते. पोलीस तिला दंड करणार असतो, मात्र ती जवळ येताच तो तिला दंड करण्याऐवजी स्वतःचं मास्क काढतो आणि तिचं चुंबन घेतो. महिलाही त्याला प्रतिसाद देते.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. त्याचं नाव उघड होऊ शकलं नसलं तरी त्याची आजवरची कारकिर्द स्वच्छ असल्याची माहिती मिळत आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण समजताच आम्ही त्या पोलिसाला निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या फुटेजमध्ये दिसणारी महिला ही सोशल डिस्टन्सिंगसारख्या कोविड काळातील नियमांचं उल्लंघन करत होती आणि तो पोलीस तिला तसं करण्याची परवानगी देत होता. तसंच आपला मास्क काढून तिचं चुंबनही घेत होता, त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या