‘माझ्या गजानना’ गाणे यू ट्यूबवर ठरतेय लोकप्रिय

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यभरात गणेशोत्सकाची धूम आहे. सगळीकडे बाप्पाच्या तयारीला वेग आला आहे. गणेशभक्तांच्या उत्साहात भर घालण्यासाठी दरकर्षी नवनवीन गाणी रिलीज होतात. यंदा सगळीकडे धूम आहे ती ‘माझ्या गजानना’ या व्हिडीओ साँगची. पराग सावंत या तरुणाने याची निर्मिती आणि दिग्दर्शन पराग आणि तुषार घाडीगावकर यांनी केले आहे. रॅप सॉंगच्या माध्यमातून चिमुकल्यांची गणेशभक्ती उलगडण्यात आली आहे.

‘पार्वती नंदना, करतो मी कंदना…देवाधिदेक तू माझ्या गजानना’ असे गाण्याचे बोल आहेत. झोपडपट्टीत राहणारी मुले गणपती बसवण्याचे ठरवतात, पण त्यांच्यापुढे प्रश्न उभा राहिलाय तो आर्थिक गणित जुळवण्याचा. मग ते अनोखी शक्कल लढकतात…‘चल चल रे कटव, चल चल रे वटव’ म्हणत एक एक वस्तू चोरून ते बाप्पा विराजमान करण्याचे ठरवतात. त्यानंतर पुढे काय होते… त्यांची चोरी पकडली जाते का? की चोरी करण्याचा त्यांचा विचारच बदलतो? बाप्पाला बसवण्याची त्यांची मनोकामना पूर्ण होते का ? हे या क्हिडीओत पाहायला मिळेल. संकल्पना सुमित पाटील, अमोघ सागकेकर आणि पराग सावंत यांची आहे. हे रॅप सॉंग मंगेश खैरे, रोहन राव यांनी लिहिले आणि गायले असून केवल वाळंजची त्यांना साथ मिळाली आहे. संगीत स्वराज चक्रवर्ती यांचे आहे.विनायक पोतदार, विकी जाधक, सचिन माने, सैल कोकाटे आदी यात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.