माधुरी म्हणतेय मजा मा! नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

प्राइम व्हिडीओने नुकताच त्यांच्या ‘मजा मा’ या पहिल्या ऍमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. या चित्रपटात ‘धकधक’ गर्ल माधुरी दीक्षित एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. तिच्यासह गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, सिमोन सिंग आदींच्या यात भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये पल्लवीच्या (माधुरी दीक्षित) आयुष्याची झलक दाखवली आहे.

पल्लवी ही तिच्या मध्यमवर्गीय घराचा व राहत असलेल्या सोसायटीचा कणा आहे. जसजशी घटनांची मालिका उलगडते, त्यामुळे पल्लवीच्या कुटुंबात वादळ येते. तिच्या मुलाचा होऊ घातलेला साखरपुडा मोडतो. पल्लवी व तिचे कुटुंब या संकटाचा सामना कसा करतील? या परिस्थितीत कुटुंबांमधील नाते अधिक घट्ट होईल की नवीन नाते मोडून पडेल? अशी अनेक धक्कादायक वळणं चित्रपटात पाहायला मिळतील. आनंद तिवारी दिग्दर्शित आणि सुमित बाठेजा लिखित ‘मजा मा’ हा चित्रपट 6 ऑक्टोबरपासून प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.