‘यारी दोस्ती’चा सिक्वेल येतोय!

आजवर कधीही समोर न आलेले दोस्तीतील पैलू मांडणाऱया ‘यारी दोस्ती’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यश मिळवले आहे. ‘यारो दोस्ती’ला यू-टय़ूबवर 8.2 मिलियन्स ह्युज मिळाले आहेत. या चित्रपटाच्या यशानंतर निर्मात्यांनी आता सिक्वेलची म्हणजेच ‘यारी दोस्ती-2’ची घोषणा केली आहे. पॅशनवर्ल्ड एंटरटेनमेंट्स आणि बुद्ध टेलिफिल्म्सची निर्मिती असलेल्या चित्रपटाची सहनिर्मिती ऑडिओ लॅब मीडिया कॉर्पेरेशन करत आहे.

सोशल मीडियावर मोशन पोस्टर लाँच करत निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केली. लेखन आणि दिग्दर्शनही शांतनू अनंत तांबे करत आहेत. चित्रपटाच्या नावावरूनच याचं कथानक मैत्रीभोवती गुंफण्यात आल्याचे स्पष्ट होते. अभिनेता हंसराज जगताप, आकाश वाघमोडे, सुमित भोस्के, आशीष गाडे, संदीप गायकवाड, शिल्पा ठाकरे, संकेत हेगणा आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या