राज्य अॅथलेटिक्स निवड चाचणीत नाशिकच्या आदेश, यमुना यांना सुवर्णपदक

ऑलिम्पिकसाठी खेळाडू निवडण्याकरिता राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्य पद स्पर्धा होणार आहे, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघाची निवड चाचणी नाशिकमध्ये घेण्यात आली. यात नाशिकचा आदेश यादव व यमुना लडकत यांनी सुवर्ण पदक मिळवले. विविध क्रीडा प्रकारांत राज्यभरातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

पंजाबच्या पतियाळा येथे 25 ते 29 जून दरम्यान 60वी राष्ट्रीय अजिंक्य पद स्पर्धा होणार आहे. यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोकियोत होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागाची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड चाचणी नुकतीच नाशिकला कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून पार पडली. धावणे, उंच उडी, हर्डल्स, भालाफेक अशा विविध प्रकारांत पुरुष व महिला गटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत आदेश यादवने सुवर्ण पदक पटकावले, तर आंतरराष्ट्रीय खेळाडू किसन तडवी द्वितीय क्रमांकाचा विजेता ठरला. 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत नाशिकची यमुना लडकत प्रथम आली.

लांब उडी स्पर्धेत नाशिकच्या पुनाजी चौधरीने तृतीय क्रमांक मिळवला. नाशिकची सुवर्णकन्या कविता राऊत हिने निवड समिती प्रमुख म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजन प्रमुख हेमंत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल शिरभाते व सहकाऱयांनी परिश्रम घेतले. जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राहुल देशमुख, कार्यकारी सदस्य चंद्रशेखर सिंग यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रथम क्रमांकाचे विजेते पुढीलप्रमाणे ः पाच हजार मीटर धावणे – आदेश यादव (नाशिक), निकिता राऊत (नागपूर); 800 मीटर धावणे – अजिंक्य मांजरे (पुणे), यमुना लडकत (नाशिक); 200 मीटर धावणे – राहुल कदम (मुंबई उपनगर), सिद्धी हिरे (पुणे); 400 मीटर हर्डल्स – सिद्धेश चौधरी (पुणे), दामिनी पेडणेकर (ठाणे); लांबउडी – अनिलकुमार साहू (मुंबई उपनगर), अमृता पाटील (रायगड); उंच उडी – राजवंत गुप्ता (मुंबई उपनगर), समीक्षा उपरीकर (अमरावती); भालाफेक – अनिल मुंगसे (संभाजीनगर); हातोडा फेक – स्नेहा जाधव (सातारा). प्रथम क्रमांकाचे विजेते पुढीलप्रमाणेः पाच हजार मीटर धावणे- आदेश यादव (नाशिक), निकिता राऊत (नागपूर); 800 मीटर धावणे- अजिंक्य मांजरे (पुणे), यमुना लडकत (नाशिक); 200 मीटर धावणे- राहुल कदम (मुंबई उपनगर), सिद्धी हिरे (पुणे); 400 मीटर हर्डल्स- सिद्धेश चौधरी (पुणे), दामिनी पेडणेकर (ठाणे); लांबउडी- अनिलकुमार साहु (मुंबई उपनगर), अमृता पाटील (रायगड); उंच उडीः राजवंत गुप्ता (मुंबई उपनगर), समीक्षा उपरीकर (अमरावती); भालाफेक- अनिल मुंगसे (संभाजीनगर); हातोडा फेक- स्नेहा जाधव (सातारा).

आपली प्रतिक्रिया द्या