
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. या उद्घाटन सोहळ्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावरून मोदींनी हे उद्घाटन आहे त्याला स्वतःचा राज्यभिषेक समजू नये असा टोला लगावला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने देखील एक ट्विट करत या सोहळ्यावर निशाणा साधला आहे. राजदने शवपेटी आणि नवे संसद भवन यांचा एकत्रित फोटो ट्विट केला असून हे काय आहे असे कॅपशन दिले आहे.
“आमच्या ट्विट मधील शवपेटी ही लोकशाही शवपेटी गाडली गेल्याचे दर्शवत आहे. देश हे सर्व मान्य करणार नाही. संसद ही लोकशाहीचे मंदिर आहे” असे राजदचे नेते शक्ती सिंह यादव यांनी या ट्विट बाबत स्पष्टीकरण देताना सांगितले आहे.
दरम्यान राजद चया या ट्विट वरून भाजप संतापली असून त्यांनी हा देशद्रोह असल्याचे म्हटले आहे. भाजप नेते सुशील मोदी यांनी या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीआहे.