लोकल सुरू झाल्या… तीन महिने शांत बसलेले चोरटेही हातसफाईसाठी तयार

1370
western-railway-local
प्रातिनिधिक फोटो

गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन झालेली लोकल पून्हा धावू लागली आहे. हळूहळू करुन लोकलची संख्या वाढविण्यात येत आहे. लोकल सुरु झाल्याचा आनंद जसा सर्वांना झालाय तसेच चोरटेदेखील खुश झाले आहेत. लोकलला गर्दी होत नसली तरी हातसफाई करण्यासाठी चोरटे तयार झाले आहेत.

लोकल सेवा जशी सुरु केली तसे चोरटे पुन्हा गुन्हा करण्यासाठी तयार झाले आहेत. लोकलमध्ये गर्दी होत नसेल पण तरी देखील अचूक संधी साधत चोरांनी मोबाईल चोरी करण्यास सुरूवात केली आहे. अशा गुन्ह्यांची नोंद होण्यास सुरूवात झाली आहे. आता तर लोकलच्या संख्येत आणखी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे चोर पुन्हा सक्रीय होण्याच्या तयारीत असून काही स्थानकांवर मोबाईल चोरण्यास सुरुवात देखील केल्याचे रेल्वे हद्दीत चोऱया करणाऱया एका गुन्हेगाराने सांगितले. तीन दिवसांपूर्की बोरीवलीच्या दिशेने जाणाऱया लोकलच्या खिडकीजकळ बसलेल्या एका महिलेच्या हातातला मोबाईल चोराने हिसकावून नेला होता. विलेपार्ले स्थानकात ही घटना घडली होती.

आपली प्रतिक्रिया द्या