वाटचाल……. गरज आकर्षक पॅकिंगची

480

<< विश्वास मुळीक >>

माण फाऊंडेशनच्या वतीने मुंबईत रवींद्र नाटय़मंदिरात नुकताच माण महोत्सव पार पडला. या महोत्सवात ६० पेक्षा अधिक महिला उद्योजकांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये घरगुती खाद्यपदार्थांपासून कौशल्याच्या आकर्षक वस्तू, विविध डाळी, मसाले, पापड, कपडे आदींचा समावेश होता. माण महोत्सवात प्रथमच मुंबईत होत असल्याने प्रचंड गर्दी होती. त्यात महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक होती. अनेक हस्तकलेच्या वस्तू तयार कशा होतात याचे प्रात्यक्षिके तिथे करून दाखविली जात होती. जसे की कुंभारकाम, लाकडापासून पोळपाट, लाटणी, रवी इत्यादी वस्तू बनविल्या जात होत्या. त्यामुळे ही प्रात्यक्षिके बघण्याकडे लहान मुलांचा रस अधिक होता. याबाबत लक्षात आले की, ठामीण भागातील या जनतेकडे कुशाठा कला आहे. कोणतेही यांत्रिक उपकरण न वापरता केवळ आपल्या हाताच्या कलेने ते वस्तू तयार करीत होते.  आज लोकांमध्ये पर्यावरणाविषयक जागरूकता निर्माण झाल्याने अशा पर्यावरणस्नेही वस्तूंची मोठय़ा प्रमाणात विक्रीही होत होती. परंतु असे असतानादेखील मला सर्वात महत्त्वाची समस्या दिसून आली ती म्हणजे वस्तूचे उत्पादन आणि गुणवत्ता खूप चांगली असूनही. त्या वस्तूला आकर्षक पॅकिंग तर दूर पण साधे पॅकिंग नव्हते. यामुळे या वस्तू कशा घेऊन जाव्यात असा प्रश्न अनेकांना सतावत होता.

उत्पादनाची गुणवत्ता कितीही चांगली असली तरी ती त्याच्या पॅकिंगला अधिक महत्त्व असते. माण महोत्सवात विविध डाळी, मसाले, पापड होते, पण त्यावर कोणत्याही उद्योगाचे नाव, वापरावयाची अंतिम तारीख असे लिहिले नव्हते. शहरातील लोक वस्तूच्या पॅकिंगला अधिक महत्त्व देतात आणि नेमके हेच ठामीण जनतेकडे नसते. माण महोत्सवामुळे ठामीण भागातील जनतेला आपला माल शहरात विकण्यास जसे व्यासपीठ दिले गेले तसे त्यांना पॅकिंगबाबत योग्य मार्गदर्शन केले असते तर अधिक चांगले झाले असते. मुंबईत ठामीण भागातील उद्योजकांचे असे अनेक महोत्सव भरतात. मालवणी महोत्सवही जागोजागी भरतात. या महोत्सवातील उद्याजकही पॅकिंगबाबत अनभिज्ञच असतात.

विदेशी कंपन्यांचे कोणतेही उत्पादन पाहिले तर त्याचे पॅकिंग आकर्षक असते. काही हिंदुस्थानी बडय़ा कंपन्याही आकर्षक पॅकिंगवर भर देत आहेत. पण पॅकिंग फक्त आकर्षक असून चालत नाही तर ते निर्जंतुक आणि टिकाऊही असलं पाहिजे. हिंदुस्थानी शेतकरी मालाचे उत्पादन योग्य करतो, पण पॅकिंगमध्ये मागे राहतो. पॅकिंगच्या विविध पद्धता, त्यांची माहिती व त्याबाबतचे योग्य मार्गदर्शन ही आता मुख्य गरज आहे.

भाज्यांसाठी पॅकिंग :

ताज्या भाज्या निर्यातीपूर्वी व्यवस्थित प्रतवारी करून निर्यातीच्या ठिकाणी शीतगृहामध्ये साठवितात आणि नंतर कागदी पुठ्ठय़ाच्या बॉक्स किंवा लाकडी बॉक्समधून परदेशी पाठविली जातात. हिंदुस्थानी विमान सेवा भाजीपाल्याची वाहतूक लाकडी खोक्यातून तर आखाती देशातील विमानसेवा भाजीपाल्याची वाहतूक बांबूच्या खोक्यातून किंवा गोणपाटाच्या पिशव्यांतून करतात.

तेलाची पॅकिंग :

आपल्या देशात पूर्वीपासूनच ठामीण भागात तेलाच्या घाणी कार्यरत आहेत. अजूनही ठामीण भागात घाणीवरूनच तेल विकत घेतले जाते. त्यामुळे अशा उद्योगांनी उत्पादित तेलाची विक्री गुणवत्तापूर्ण पॅकिंगमध्ये केली पाहिजे. हिंदुस्थानी बाजारपेठेचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, पिशव्याबरोबर पॅकिंग केलेल्या तेलाची मागणी दरवर्षी 20 ते 25 टक्क्यांनी वाढते आहे. त्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आता प्रक्रिया आणि पिशवीबंद तेलाच्या विक्रीमध्ये उतरल्या आहेत.

फळांसाठी पॅकिंग :

फळांचा ताजेपणा टिकविण्यासाठी आता बरेच उद्योग (श्Aझ् :  श्द्ग्गि् Atस्देज्पा झ्aम्क्agग्हु) या पद्धतीकडे वळले आहेत. यामुळे फळावर सूक्ष्म जीवांची वाढ होत नाही. त्यांचा रंग, चव शेवटपर्यंत टिकवता येते.

मातीच्या वस्तूंसाठी पॅकिंग :

कुंभार व्यावसायिकांनी तयार केलेल्या मातीच्या विविध वस्तू, जसे की भांडी, मडकी, मातीचा तवा इत्यादी थर्मोकॉल किंवा पुठ्ठय़ाचा बॉक्स तयार करून त्यात वाळवलेलं गवत घालून मातीच्या वस्तू पॅक कराव्यात म्हणजे त्या वस्तू न फुटता स्थलांतरित होऊ शकतील.

घरगुती खाद्यपदार्थांचं पॅकिंग :

मसाले, पापड, डाळी, कडधान्ये, सुका मेवा यांचे पॅकिंग निर्जंतुक फिल्ममध्ये करावे. त्यावर उद्योगाचे नाव, पॅकिंग केल्याची तारीख आणि वापरावयाची अंतिम तारीख याची नोंद असावी म्हणजे ठाहकाला ते पसंत पडेल. आज अनेक ठिकाणी पदार्थ प्लॅस्टिक पिशव्यातून दिले जाते. पण त्या निर्जंतूक किती असतात हा प्रश्न आहे.

अशा प्रकारे जागतिकीकरणाचा फायदा घेऊन ठामीण भागातील व्यावसायिकांनी आपल्या दर्जेदार मालाची प्रक्रिया करून आकर्षक व गुणवत्तापूर्ण पॅकिंग केले तर परदेशी व हिंदुस्थानी बाजारपेठेत ठामीण भागातील उत्पादनाला मानाचे स्थान मिळवून देणे सहज शक्य होईल.

आपली प्रतिक्रिया द्या