विनोद राय यांची बीसीसीआयवर प्रशासक म्हणून नियुक्ती

368

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

माजी महालेखापाल विनोद राय यांची सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या प्रशासक समितीच्या प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. लोढा समितीच्या शिफारसींनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजिय शिर्के यांना पदावरून हटवण्यात आलं होतं. बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी या समितीचं गठन करण्यात आलं आहे. विनोद राय यांच्याच कारकिर्दीमध्ये युपीएच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा खुलासा झाला होता. कोळसा घोटाळा, टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा हे त्यातली काही उदाहरणं आहे.

विनोद राय यांच्याव्यतिरिक्त या समितीमध्ये इतिहासकार रामचंद्र गुहा, आईडीएफसी बैंकचे विक्रम लिमये आणि हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांचाही समावेश करण्यात आला आहे. क्रीडा मंत्रालयाच्या सचिवाचा या समितीमध्ये समावेश असावा अशी मागणी करण्यात आली होती मात्र ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आयसीसीमध्ये बीसीसीआयचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी विक्रम लिमये आणि बीसीसीआयचे सहसचिव अमिताभ चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही प्रशासक समिती लोढा समितीने सुचवलेल्या शिफारसी अंमलात आणल्या जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवेले. ४ आटवड्यांनंतर या समितीला सर्वोच्च न्यायालयाला अहवाल सादर करायचा आहे, त्यामध्ये काय बदल करण्यात आले आहेत किंवा काय अपेक्षित आहे याबाबत या अहवालामध्ये माहिती देण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या