संपूर्ण गावाने केला अवयवदानाचा संकल्प, लातूरच्या आनंदवाडीची देशात दखल

सामना ऑनलाईन । लातूर

मराठवाड्यातील लातूरच्या आनंदवाडी गावातील सर्वांनी अवयवदानाची मोहिम सुरु केला आहे. आनंदवाडी गावाचा त्यामुळे देशपातळीवर त्यांचा गौरव केला जात आहे.आनंदवाडी हे लातूर जिल्ह्यातील गाव लहान असलं तरी गावकऱ्यांची कामगिरी मात्र महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी आहे. अवयव दानाच्या उपक्रमात देशात अग्रेसर येण्याचा बहुमान या गावाने पटकावला आहे.

गेल्या १४ ऑगस्टला स्मशामभूमीत श्रमदान करण्यासाठी गावकरी एकत्र आले. मात्र त्याचवेळी ग्रामसेवकाने त्यांच्यासमोर अवयवदानाची कल्पना मांडली. त्यानंतर संपूर्ण गावाने एकमुखाने मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतला. कोणतही काम करायचं तर ते एकत्र येऊनच, असा या गावाचा आता नियम झाला आहे. गावचे रस्ते , ग्रामपंचायतीची इमारत ही सर्व कामे गावकऱ्यांनी स्वत: पूर्ण केली आहेत.

या गावात आजवर कधीही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. या गावाला तंटामुक्त गावाचा पुरस्कार मिळाला आहे. तो ते इमानेइतबारे जपताहेत.