सच कहूं तो… पुस्तकातून उलगडणार नीना गुप्ता यांचा जीवनप्रवास

अभिनेत्री नीना गुप्ता नव्या वर्षांत आपल्या आयुष्याचा जमाखर्च मांडणारे ‘सच कहूं तो’ पुस्तक घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आयुष्याला उभं करणाऱ्या तसंच मोडून टाकणाऱ्या अनेक घटना, स्वतःमधील दोष- उणीवा, तुटलेल्या नात्यांची गोष्टी आणि इंडस्ट्रीतील दीर्घ कारकिर्दीचा लेखाजोखाच जणू त्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडणार आहेत.

कोरोना संकटात नीना गुप्ता उत्तराखंड येथील मुक्तेश्वर या निसर्गसुंदर गावात वास्तव्याला होत्या. तिथेच ‘सच कहूं तो’ हे पुस्तक लिहिण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी लिहायला सुरुवात केली. याविषयी नीना गुप्ता म्हणाल्या, पक्ष्यांचा मधुर आवाज, पर्वतरांगांमधील फेरफटका, तिथली थंडगार हवा झेलताना मला जाणवंल की माझ्याकडे विचारांशिवाय दुसरं काही नाही. मी का पुस्तक लिहावं? मी स्वतःलाच प्रश्न केला. माझं असं काय म्हणणं आहे जे दुसNयाच्या कामी येईल, दुसNयाला प्रेरणा देईल. माझं जीवन अनेक घटनांनी भरलेलं आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी स्वतःला मुक्त करण्याची गरज वाटत आहे.

‘सच कहूं तो’ पुस्तकाची घोषणा आज पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने ट्विटरवर केली. नीना गुप्ता यांचे दिल्लीतील करोल बाग येथील बालपण, एनएसडीतील प्रशिक्षण, मुंबईत येऊन कामासाठी केलेला संघर्ष, त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारकिर्दीवर हे पुस्तक असल्याचे प्रकाशनातर्पâे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या