हिंदुस्थान दौरा खरी कसोटी-स्मिथ

258

सामना ऑनलाईन,सिडनी

पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेट मालिकेत ३-० फरकाने धूळ चारल्यानंतरही हुरळून न जाता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने आमची खरी ‘कसोटी’ हिंदुस्थान दौऱयावरच असेल अशी प्रतिक्रिया दिली.

स्मिथ म्हणाला, ऑस्ट्रेलियाला आगामी महिन्यात कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ‘टीम इंडिया’शी दोन हात करायचे आहेत. हिंदुस्थान सलग  १८  कसोटी सामन्यांत अजिंक्य आहे. शिवाय हिंदुस्थानला घरच्या मैदानावर हरवणे सोपे नसते. त्यातच विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

ऑस्ट्रेलियाला हिंदुस्थान दौऱ्यावर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. २००४ नंतर ऑस्ट्रेलियाला हिंदुस्थान दौऱ्यावर एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. उलट सात लढतींत पराभवाचे तोंड पाहावे लागले. ऑस्ट्रेलियाने २०१३ मध्ये हिंदुस्थानचा अखेरचा दौरा केला होता. त्यावेळी आम्हाला हिंदुस्थानकडून ०-४ फरकाने पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला खरे आव्हान हिंदुस्थान दौऱ्यावरच असेल असे स्टीव्हन स्मिथचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या