ई-पीक appमुळे शेतकऱ्यांना मिळेल २४०हून अधिक पिकांची माहिती

ई-पीक पाहणी मोबाईल  appमध्ये केवळ शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे हे उद्दिष्ट नसून शेतकऱ्यांनी कोणते पीक, कोणत्या भागात घ्यावे, पिकांची बाजारपेठ, पिकांची वर्गवारी, योग्य भावासह एकाचेळी 240 हून अधिक पिकांची माहिती शेतकऱ्यांना मिळेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी ई–पीक पाहणीबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.

ई-पीक पाहणीसंदर्भात मोबाईल app विकसित करताना यामध्ये कोणत्याही उणिवा राहू नये असे मुख्यमंत्री म्हणाले. हे मोबाईल app शेतकऱ्यांसाठी उपयोगी असल्याने त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. या appमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइनबरोबरच ऑफलाइन पद्धतीने माहिती, इमेजेस अपलोड करण्याची सोय देण्यात आली ही अत्यंत चांगली बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या