सरफराज खानचे झुंजार दीडशतक आणि ऋषभ पंतच्या 99 धावांच्या झुंजार खेळीमुळे पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात टीम इंडियाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर उर्वरित 5 फलंदाज केवळ 29 धावांत माघारी परतल्याने सरफराज व पंतच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. हिंदुस्थानचा दुसरा डाव 99.3 षटकांत 462 धावसंख्येवर संपुष्टात आल्याने न्यूझीलंडला विजयासाठी केवळ 107 धावांचे आव्हान मिळाले. उद्या कसोटीचा पाचवा अन् अखेरचा दिवस असल्याने न्यूझीलंडला विजयाची संधी असेल. मात्र, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याने टीम इंडियाला बाजी मारण्यासाठी चमत्काराचीच गरज आहे.
कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची बॅटींग बघायला मिळाली होती. मग दुसर्या दिवशी नाणेफेकीचा काwल जिंकूनही चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीचा अंदाज न आल्याने प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय टीम इंडियाच्या अंगलट आला. त्यांचा पहिल्या डावात अवघ्या 46 धावांवर खुर्दा उडाला. प्रत्युत्तरादाखल पाहुण्या न्यूझीलंडने 402 धावा करीत पहिल्या डावात 356 धावांची आघाडी घेत आर्धी लढाई येथेच जिंकली.
सरफराज-पंत जोडीने नेले चारशेपार
टीम इंडियाने तिसर्या दिवसाच्या 3 बाद 231 धावसंख्येवरून शनिवारी सकाळी दुसर्या डावात पुढे खेळायला सुरूवात केली. शुक्रवारी 70 धावांवर नाबाद परतलेला सरफराज खान आणि कोहलीच्या जागेवर आलेला ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानला चारशे पार नेले. दरम्यान, पावसामुळे दोन तासांचा खेळ वाया गेला. त्यातच उपहाराची 40 मिनिटेही होती. सरफराजने 195 चेंडूंच्या मॅरेथॉन खेळीत 150 धावा करताना 3 उतुंग षटकारांसह 18 चेंडू सीमापार पाठविले. पंतने 105 चेंडूंच्या आक्रमक खेळीत 99 धावा करताना 9 चौकार व 5 षटकारांचा घणाघात केला.
नवा चेंडू ठरला टार्ंनग पॉईंट
न्यूझीलंडने 80 षटकानंतर नवा चेंडू घेण्याचा निर्णय घेतला अन् हाच या कसोटीतील टार्ंनग पॉईंट ठरला. किवींच्या वेगवान गोलंदाजांनी सरफराज खान व ऋषभ पंत यांना स्विंग गोलंदाजीने जेरीस आणले. टीम साऊथीने सरफराजला पटेलकरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली अन् न्यूझीलंडला मोठे यश मिळवून दिले. सरफराज बाद झाला तेव्हा हिंदुस्थानची 4 बाद 408 अशी भक्कम स्थिती होती. मग वन डे स्टाईल फलंदाजी करणार्या ऋषभ पंतचे अवघ्या एका धावेने हुकलेले शतक चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले. विल्यम ओ’रूर्वैचा एक चेंडू बॅटच्या खालच्या कडेला चाटून यष्टयांवर आदळला अन् पंतचे विक्रमी सातवे कसोटी साजरे होता होता राहिले.
अन् रोहित, विराट पंचांवर भडकले
न्यूझीलंडच्या दुसर्या डावाला सुरूवात झाल्यानंतर जसप्रीत बुमराहने केवळ चार चेंडू टाकल्यानंतर पंचांनी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. 20 मिनिटे आधीच खेळ थांबविल्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहली पंचांवर भडकले. चेंडू व्यवस्थित दिसतोय. शिवाय फ्लड लाईटही चालू आहे, मग सामना थांबविण्याची काय गरज आहे, असा पवित्रा त्यांनी घेतला. मात्र, पंचांनी त्याचे म्हणणे ऐकले नाही. तोपर्यंत शुन्यावर खेळत असलेले न्यूझीलंडचे सलामीवीर तंबूत परतले होते. त्यानंतर काही वेळाने पावसालाही सुरूवात झाली.
अनुभवी फलंदाजांकडून निराशा
सरफराज-पंत जोडी तंबूत पतरल्यानंतर लोकेश राहुल, रवींद्र जाडेजा व रविचंद्रन अश्विन या अनुभवी खेळाडूंकडून देशवासियाना मोठी अपेक्षा होती. मात्र, या तिकडीने साफ निराशा केली. राहुल 12, जाडेजा 5 व अश्विन 15 धावांवर बाद झाले. अखेरचे 5 फलंदाज 29 धावांवर बाद झाल्याने या कसोटीचे पारडे न्यूझीलंडच्या बाजूने झुकले. मॅट हेन्रीने जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांना भोपळाही पह्डू दिला नाही, तर कुलदीप यादव 6 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून हेन्री व ओ’रूर्वै यांनी 3-3 फलंदाज बाद केले, तर एजाज पटेलला 2 बळी मिळाले. टीम साऊथी व ग्लेन फिलिप्स यांनी 1-1 गडी टिपला.