वीज ग्राहकांना दरवाढीचा झटका बसणार; महावितरणकडून एमईआरसीला प्रस्ताव सादर

राज्यातील सुमारे पावणेतीन कोटी वीज ग्राहकांच्या डोक्यावर नव्या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिलपासून दरवाढीचा बोजा पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. महावितरणने  वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीची फेरआढावा याचिका आज दाखल केली आहे. त्यावर मार्चअखेरपर्यंत निर्णय होणार असून सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार आहे. सध्या वीज नियामक आयोगाकडून पाच वर्षांसाठी बहुवार्षिक वीज दर निश्चिती केली जाते. त्यानुसार महावितरणने 2023-24 आणि 2024-25 या कालावधीसाठीच्या वीज दराचा फेरआढावा घेण्यासाठी महावितरणने याचिका दाखल केली आहे. त्याची आयोगाकडून प्रथम तांत्रिक छाननी केली जाईल. त्यानंतर त्यावर ग्राहकांकडून सूचना व हरकती मागवल्या जातील. तसेच जनसुणावणी घेत मार्चअखेरपर्यंत दरवाढ केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.