गजानन महाराज संस्थानच्या वतीने पुरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाख मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

3396

राजेश देशमाने । बुलढाणा

आलेल्या दानाचा उपयोग नेहमीच समाजसेवेसाठी करणार्‍या श्री संत गजानन महाराज संस्थानने शनिवारी पुरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाख रुपयांचा मदत निधीचा धनादेश संस्थानचे विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला.

शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे रद्द झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात चार ठिकाणी शोकसभा घेवून गजानन महाराजांच्या दर्शनासाठी ते शेगावला रवाना झाले. सायंकाळी त्यांनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून श्री गजानन महाराज संस्थानचे कार्य संस्थानचे विश्वस्त निळकंठदादा पाटील यांच्याकडून समजावून घेत मंदिर परिसरात फेरफटका मारला. त्यानंतर संस्थानच्या कार्यालयात त्यांना सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने एक कोटी अकरा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थानचे आभार मानत संस्थान नेहमीच आलेल्या दानाचा उपयोग समाज कार्यासाठी करत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना समवेत केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, कामगार मंत्री संजय कुटे व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील होते.

आपली प्रतिक्रिया द्या