मुंब्य्रात एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त

23

सामना प्रतिनिधी । ठाणे

मुंब्य्राच्या रेतीबंदर भागात मंगळवारी रात्री उशिरा सापळा रचून पोलिसांनी एक कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा जप्त केल्या. या नोटा बदलण्यासाठी आणण्यात येत होत्या. मात्र पोलिसांनी हा डाव उधळून लावला असून एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सिल्व्हर रंगाची टोयोटा कार व काही मोबाईल्स जप्त केले आहेत.

एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आणल्या जात असल्याची खबर लागताच पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांच्या टीमने सापळा रचून संदीप चिकानाहल्ली, अतुल सिंग व सोनल रोजानी यांना अटक केली. ते सर्वजण ज्या गाडीने आले त्याची झडती घेतली असता आतमध्ये जुन्या पाचशे रुपयांच्या दहा हजार तर एक हजार रुपयांच्या पाच हजार नोटा आढळून आल्या. या सर्व नोटा जप्त केल्या असून त्या कोणासाठी आणल्या होत्या याचा शोध पोलीस घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या