संभाजीनगरमध्ये गेल्या 24 तासांत 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू

संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात गेल्या 24 तासांत 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयातील एकूण मृतांचा आकडा 200 वर पोहोचला आहे.

शहरातील सर्वच रुग्णालयांतून गंभीर रुग्ण घाटीत संदर्भित केले जातात. त्या ठिकाणी 200 हून अधिक रुग्ण उपचार घेत असून पैकी 70 टक्के रुग्ण गंभीर आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये घाटी रुग्णालयात कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा सारखा वाढत आहे. गेल्या 24 तासांत घाटीत तब्बल 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयातील मृतांची संख्या आता 200 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या