लंडन: गाडीच्या धडकेत १० गंभीर जखमी, अपघात की घातपात?

29

सामना ऑनलाईन । लंडंन

उत्तर लंडनच्या फिन्सबरी पार्क परिसरातील एका मशीदीजवळ विचित्र अपघात घडला. सोमवारी पहाटे १२:२० वाजता नमाजावरून परतत असणाऱ्या पादचाऱ्यांना एका गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात १० जण जखमी झाले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात आहे का घातपात याचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

लंडनमधील मुस्लिम काऊंसिलने ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, सध्या रमझानचा महिना सुरू असून यावेळी नमाजाच्यानंतर बाहेर पडून आपल्या घराकडे परतणाऱ्या लोकांला एका भरधाव गाडीने धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या सर्वांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

याआधी लंडन ब्रिजवर गाडी आणि धारदार शस्त्राचा वापर करून दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. त्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला होता. तर मॅनचेस्टरमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान झालेल्या स्फोटात २० जणांचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या