मेस्सीचा खेळ पाहण्यासाठी दहा लाख चाहत्यांची गर्दी

अर्जेंटिना जगज्जेता झाल्यानंतर प्रथमच आपल्या मायभूमीत खेळणार असून येत्या 23 मार्चला पनामाविरुद्ध होणाऱया मैत्रीपूर्ण सामन्यासाठी तब्बल 10 लाख चाहत्यांनी ऑनलाईन तिकिटांसाठी गर्दी केली आहे. अर्जेंटिनाच्या फुटबॉल महासंघाने 63 हजार तिकीटे विक्रीसाठी ठेवली आहेत. ज्यांची किंमत 57 डॉलर्सपासून 240 डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन तिकीट विक्री सुरू होताच काही तासातच सर्व तिकीटे विकली गेली आहेत. अर्जेंटिना या सामन्यानंतर 28 मार्चला सॅण्टियागो डेल एस्टेरो प्रांतात कुराकोआविरुद्ध एक आणखी एक मैत्रीपूर्ण लढत खेळणार आहे. या सामन्यावरही हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे.