विलेपार्लेत दहा लाखांचा एमडी तर पवईत चार लाखांचा गांजा पकडला

फाईल फोटो

मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली विरोधी पथकाने आज विलेपार्ले आणि पवई येथे धडक कारवाया केल्या. दोघा ड्रग्ज तस्करांना रंगेहात पकडून तब्बल 10 लाखाचा एमडी आणि चार लाख 20 हजाराचा गांजाचा साठा जप्त केला.

अंमली विरोधी कक्षाच्या वांद्रे युनीटचे एपीआय बंडगर आणि पथक विलेपार्ले पश्चिमेकडील मिठ्ठीभाई कॉलेज परिसरात गस्त घालत असताना एक तरूण काळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पदरित्या जाताना त्यांच्या नजरेस पडला. त्यामुळे पथकाने त्याला अडवून त्याच्याकडील बँगेची तपासणी केली असता बगेत 250 ग्रॅम एमडीचा साठा आढलला. 10 लाख किंमतीचा हा एमडीचा साठा असून व्यवसायाने लेखक असलेला हेरॉन अशोक राय (30) याने हा एमडीचा साठा कुठून आणला व तो कोणाला विकणार होता याचा तपास पोलीस करीत आहेत.

वांद्रे युनिटचे उपनिरीक्षक पावले व त्यांचे पथक पवईच्या साकीविहार रोड परिसरात गस्त घालत असताना तेथून पायी जाणारा तरुण संशयास्पद हालचाल करताना दिसल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या नायलॉन बॅगेची तपासणी केली असता बॅगेत 21 किलो गांजा सापडला. चांदाली बशीर अहमद अन्सारी (45) असे गांजाची तस्करी करणाऱया आरोपीचे नाव असून तो पुण्याचा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या