बुलढाणा 10 नवे रुग्ण; 148 अहवाल कोरोना निगेटिव्ह

832

बुलढाण्यातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण 158 अहवाल मिळाले आहेत. यापैकी 148 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून 10 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 6 व रॅपिड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 49 तर रॅपिड टेस्टमधील 99 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 148 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह अहवालामध्ये चिखली येथील 28 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, लक्ष्मी चौक मलकापूर येथील 47 वर्षीय पुरूष, माळीपुरा चिखली येथील 26 वर्षीय पुरूष, बाळापूर फैल खामगाव येथील 25 वर्षीय पुरूष, खामगाव येथील 51 वर्षीय महिला व 39 वर्षीय पुरूष, हिवरखेड ता. लोणार येथील 18 वर्षीय तरूणी, नांदुरा येथील 8 वर्षीय मुलगा व 30 वर्षीय पुरुष रुग्णाच्या अहवालांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सोमवारी 18 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये घासलेटपुरा नांदुरा येथील 45 वर्षीय पुरुष, सिव्हील लाईन खामगाव येथील 45 वर्षीय पुरुष, आळसणा ता. शेगाव येथील 55, 38 व 30 वर्षीय महिला, 12 व 6 वर्षीय मुलगा, 10,8, 3 व 2 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय युवक, 30 वर्षीय पुरुष, ताज नगर नांदुरा येथील 62 वर्षीय पुरुष, जामा मस्जीदजवळ मेहकर येथील 15 वर्षीय दोन युवती, 9 वर्षीय मुलगा आणि डिएसडी बुलडाणा येथील 44 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत 4726 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 270 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सोमवारी 72 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 4726 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 492 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 270 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 205 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या