फक्त 28 तासात उभी केली 10 मजली टोलेजंग इमारत…वाचा सविस्तर…

घर बांधायचे ठरवल्यावर त्यासाठी आयुष्यभराची जमापुंजी खर्च करावी लागते, तसेच त्यासाठी किती वेळ लागणार, याकडेही लक्ष द्यावे लागते. एखादे घर बांधण्यासाठी 2 ते 3 वर्षे सहज निघून जातात. तर इमारतीसाठी 5 ते 7 वर्षे लागतात. मात्र, चीनमध्ये अवघ्या 28 तासात 10 मजली टोलेजंग इमारत उभी करण्यात आली आहे. सोशल मिडीयावर सध्या हा चर्चेचा विषय आहे.

फक्त 28 तास 45 मिनिटात चीनच्या एका कंपनीने 10 मजली निवासी इमारत उभी केली आहे. हे अशक्य वाटते. मात्र, या कंपनीने हे प्रत्यक्षात साकार केले आहे. चीनच्या चांग्शामध्ये ब्रॉड ग्रुपद्वारे ही इमारत उभारण्यात आली आहे. ब्रॉड ग्रुप हा चीनमधील मोठा उद्योगसमूह आहे. विविध क्षेत्रात या उद्योगाचा विस्तार झाला आहे.

एवढ्या कमी वेळात 10 मजली इमारत उभी केल्यामुळे सोशल मिडीयवर याची चर्चा आहे. कंपनीने या इमारतीच्या निर्माणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. कमी वेळेत इमारत उभी करण्यासाठी विशिष्ट पद्धत वापरण्यात आली आहे. त्याला पूर्व निर्मित प्रणाली असे नाव देण्यात आले आहे. या पद्धतीत इमारतीचे सर्व लहानमोठे भाग आधीच तयार करण्यात येतात. त्यानंतर ते जोडून इमारत उभारण्यात येते.

कारखान्यात तयार झालेले हे भाग कंटेनरमधून निर्मिती स्थळावर आणण्यात आले. त्यानंतर आराखड्याप्रमाणे ते एकावर एक रचत नटबोल्डने जोडण्यात आले. इमारत पूर्ण झाल्यावर वीज आणि पाण्याच्या जोडण्या देण्यात आल्या. अशा प्रकारे ही इमारत अवघ्या 28 तास 45 मिनिटात तयार झाली आहे. इमारत निर्माणाचा 4 मिनिचे 52 सेंकदांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अंत्यत साध्या सोप्या पद्धतीने इमारत उभा करण्यात आली आहे. त्यासाठीचा खर्चही कमी असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या