खूशखबर! आयफोन-८वर जिओकडून १० हजारांची सूट

सामना ऑनलाईन । मुंबई

आयफोन प्रेमींसाठी एक खूशखबर आहे. अॅपलच्या नव्या आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लसवर १० हजार रुपयांची घसघसीत सूट मिळणार आहे. रिलायन्स जिओ ग्राहकांना सूट देणार आहे. २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंत या दरम्यान नवा आयफोन बूक केल्यास जिओकडून १० हजार रूपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात येणार आहे. हिंदुस्थानात २९ सप्टेंबरपासून नव्या आय़फोनची प्री-बुकींग सुरू होणार आहे.

जिओकडून मिळणारी १० हजारांची कॅशबॅकची ऑफर केवळ सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डवर मिळणार आहे. कंपनीकडून आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लसवर ७० टक्के बायबॅक गॅरेन्टी दिली जात आहे. एका वर्षासाठी ही रिटर्न पॉलिसी लागू असणार आहे. ही ऑफर रिलायन्स डिजीटल स्टोअर्स आणि जिओ डॉट कॉम या वेबसाइटवरून खरेदी केल्यावरच लागू होणार आहे.

नव्या आयफोनची हिंदुस्थानातील किंमत
आयफोन-८ (६४ जीबी) – ६४ हजार रूपये
आयफोन-८ (२५६ जीबी) – ७७ हजार रूपये
आयफोन-८ प्लस – ७३ हजार रूपये
आयफोन-८ प्लस (२५६ जीबी) – ८६ हजार रूपये