कर्जमंजुरीच्या नावाखाली 10 हजारांची पोत पळवली

तुमच्या मुलाचे कर्ज मंजूर झाले, असे सांगून घरात एकटया असलेल्या महिलेची दहा हजारांची पोत घेऊन भामटयाने पोबारा केला. ही घटना काल हिरावाडी परिसरात घडली.

पंचवटीच्या हिरावाडीतील जोशी कॉलनीत राहणाया लक्ष्मी मधुकर आमरे या शनिवारी दुपारी घरी एकटयाच होत्या. एका अनोळखी व्यक्तीने तुमचा मुलगा महेश याचे कर्ज मंजूर झाले आहे, असे सांगत घरात प्रवेश केला. मुलाचे नाव घेतल्यामुळे आमरे यांनी विश्वास ठेवला. कागदपत्राचे शुल्क दहा हजार घेण्यासाठी मला पाठविले आहे. दहा हजार द्या, नाहीतर त्या किंमतीची वस्तू द्या, असे म्हणत त्यांची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत त्याने ताब्यात घेतली. बँकेचे मोठे साहेब येत आहेत, त्यांच्यासाठी चहा ठेवा असे म्हणत भामटयाने त्यांना स्वयंपाक घरात पाठवित पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या